Wednesday, October 10, 2007
इक वो दिन भी थे.......इक ये दिन भी है......
share trading सध्या एकदम जोरात सुरू आहे. मार्केट पण एकदम वर..... मी इतके दिवस विचार करायचे....आपण काय फारच कमी trading करतो. त्यातूनपण नफा मोजकाच!...मग हे इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवायची गरज नाही...कुणाच्या लक्षात येणार आहे?....पण परवा कुणाशीतरी बोलताना एकदम ट्युब पेटली....बस का निशा....तू इतकी चमी कशी??.....अग बाळे...आपला पॅन नंबर दिलेला असतो ट्रेडींग अकाउंट उघडताना.....सरकार दरबारी जरी कितीही लाल फित कारभार असला...तरी दिवसेंदिवस ते पण technology wise पुढे चालले आहेत.....return e-filing व्हायला लागलेत....उद्या त्यांनी फ़क्त पडताळून पाहायचं ठरवलं तर माझी ही "तथाकथित लपवलेली" मिळकत trace होणे किती सोप्पं आहे!!! आणि मुख्य म्हणजे याबाबत आपण लपवालपवी करायला काही संधीच नाहीये.
काय करणार बापडी....म्हटलं चला निदान माझ्या शेअर बाजारातल्या छोट्याशा मिळकतीतला किती भाग त्यांच्या घशात जाणार आहे ते तरी मोजून बघू! trading acccount उघडलं...सगळया transactions चा रिपोर्ट काढला. पण short term आणि long term capital gain calculate करणं पटकन जमेना. आणि मग मला आठवलं काही वर्षापुर्वी मीच from scratch डेव्हलप केलेलं SimAcc!!!!!............hhhmmmm....जे मला आत्ता बघायचं आहे बरोब्बर तोच रिपोर्ट मी SimAcc मध्ये बनवला होता आणि commerce ची अजिबात अक्कल नसलेल्या मला अकाउंट्स...शेअर.....बॅलन्स शीट...हे सगळं समजून मग त्याचं application मध्ये रुपांतर करताना डोक्याचा भुगा झाला होता. काश.........आत्ता मला शेअर मार्केट बद्दल माहित आहे...तेवढं तेव्हा माहीत असतं.....मी अजून कितीतरी चांगली बनवली असती सगळी system!!!
माझ्याकडे अशाच पडलेल्या पुर्वीच्या Sinewave च्या CD शोधायला सुरूवात केली, एक मिळेल तर शपथ!!! मग Sinewave च्या site वर गेले. मी एकेकाळी design केलेल्या site चे रंगरूप पूर्ण बदलले होते. चांगलं होतं..पण आतमध्ये कुठेतरी छोटसं वाईट वाटलं. बावळट पणा होता...मी सोडल्यानंतर काय गोष्टी कायम तशाच राहणार होत्या??...मी पुढे जातेय.....बदलतेय......तिकडे पण बदल होतच राहणार....."बदल ही एकच गोष्ट जगात कायम असते!"....योग्य वेळी प्रसिद्ध ओळ आठवली. तेव्हा कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं...कधीकाळी मीच Develop केलेलं product असं Download करुन वापरावं लागेल. अर्धा तास Download केलं...install केलं. तो चिरपरिचित Taxbase चा login screen ओपन झाला!!!!..... मी स्वत:च त्या स्क्रीनवर किती वेळेला काम केले होते!!! तिथून SimAcc...तो SimAcc Home चा स्क्रिन दिसला.......आणि काय वाटलं ते वर्णन करणं अशक्य आहे!!..कुंभ के मेले मे बिछडा हुआ...मेरा बच्चा अचानक मुझे मिल गया!!!!.......
माझ्या सारख्या माणसांच काही होऊ शकत नाही....निर्जीव वस्तूंच्या पण प्रेमात पडतात.....माझी खुर्ची....माझी जागा....मी बनवलेलं software...आणि सानिध्यात आलेली प्रत्येक गोष्ट...प्रत्येक गोष्टीशी स्वत:ला जोडते.(म्हणूनच माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा छाप असेल याची मी काळजी घेते..पन्नास एकसारख्या work-stations मधून माझं work-station कसं सहज वेगळं दिसतं हे माझ्या आजूबाजूला बसणा-यांना लगेच कळू शकतं!!).......आणि मग सोडून जायची वेळ आली की वाईट वाटतं....
Sinewave च्या बाबतीत वाटणारी attachment थोडी जास्त आहे. जेव्हा माझी खात्री होत चालली होती की IT field मध्ये आपलं काही होत नाही...२००१ साल....पुर्ण slack period......मोठ्या मोठ्या कंपन्या experienced लोकांना काढताहेत....तिथं आपल्या सारख्या फ़क्त science graduate....engineer पण नाही...अशा फ़्रेशरचा काय पाड लागणार??....आपण आपले कुठे तरी फॅकल्टी किंवा data entry operator म्हणून चिकटणार....आणि मग कुठल्या तरी मिडीऑकर माणसाशी लग्न करून त्याचा मिडीऑकर संसार सांभळणार....आणि अगदी समजा ग्रेट नवरा मिळलाच...तर त्याच्यापुढे आपली लायकी ती काय.......म्हणून सगळं आयुष्य inferiority complex मध्ये घालवणार!!! अशा मनस्थिती मध्ये NIIT तून development interview चा शेवटचा चान्स म्हणून sinewave ला गेले...आणि जंगल मे मंगल हो गया.......sinewave मे हम पहले ४ दिन QA...और फ़िर डेव्हलपर हो गये!
तीन वर्षे तिथं अगदी वेड्यासारखं काम केलंय....किती वेळेला मला एखाद्या प्रोब्लेम चे solution झोपेतून मध्येच जाग आल्यावर किंवा ब्रश नाहीतर आंघोळ करता करता एकदम सुचायचं...आणि ऑफ़िस ला जाऊन ते try out करून बघितल्या शिवाय मग चैन पडत नसे. customer support माझा पहिला प्रोजेक्ट...आणि sinewave चं in-house software....दररोज ऑफ़िसमध्ये निदान १०-१२ कॉम्प्युटर्स वर ते चालू असलेलं बघून आणि आपण बनवलेल्या product लोकांना अवलंबून असलेलं पाहून इतकं समाधान वाटायचं ना......
yardi चं ऑफर लेटर हातात मिळाल्यावर मी ज्या दिवशी sinewave मध्ये resign केले होतं...रात्री घरी येऊन रडले होते....रडताना पण एकीकडे कळत होतं.....हे विनोदी आहे.....नवीन चांगला job मिळाला आहे....आपल्याला आनंद पण झालाय...आणि एकीकडे रडतोय.....उद्या जाम हसू येईल स्वत:लाच अशा पोरकटपणा वर....आणि आता ते तसं येतं ही!!! पण नवीन job चा आनंद जितका खरा होता...तितकेच त्या वेळी डोळ्यात आलेले अश्रू पण.....ते फ़क्त त्या क्षणासाठी होते....आणि त्या क्षणापुरते १०० टक्के खरे सुद्धा!
जशी sinewave साठी मनात खास जागा आहे....तशीच yardi साठी पण....sinewave माझ्या स्वप्नांपर्यंत जाण्याची पायवाट दाखवली असेल तर....yardi ने त्या पायवाटेचा express highway केला. भविष्यात कधी तरी...जेव्हा कदाचित yardi ला पण निरोप द्यायची वेळ येईल...तेव्हा पण मी रडणार आहे...मला माहितीये....आणि मग काही वर्षांनी त्या रडण्यावर हसेन पण!!.....express highway वर पुढे जाताना कदाचित पुढे पण काही चांगले विसावे भेटतील....पण Sinewave आणि Yardi...कायमच special राहतील.
असो....तरीही कुंभमेळ्यात सापडलेल्या "मेरा बच्चा" ची संगत थोड्याच दिवसाची आहे. ३० दिवसांचं trial license संपेल.(आणि १०,००० च्या नफ़्याचा हिशोब ठेवण्यासाठी मी ६,००० चं license विकत नक्कीच घेणार नाहीये!!)..आणि मग तो मला login screen च्या पुढे जाऊ देणार नाही. बहुतांशी डेव्हलपर्स सारखं मी माझ्या स्वत:साठी मागचे बरेच दरवाजे उघडे ठेवले होते....अगदी license चेक bypass करण्यासाठी पण मार्ग तयार केले होते. पण शेवट च्या काही महिन्यांमध्ये अपघाताने कोणाला तरी त्या चोरट्या मार्गांचा शोध लागेल आणि ते फ़ार भयानक ठरू शकेल....म्हणून मीच सगळे बंद केले.परत ते चोर दरवाजे उघडण्याच्या किल्ल्या काळाच्या ओघात माझ्या आठवणीतून पुसट झाल्या आहेत..त्यामुळे बंद दरवाज्याकडे बघून परत फ़िरण्याशिवाय मी दुसरं आता काही करू शकणार नाही................
Thursday, August 16, 2007
अमेरिकावारी २ - स्काय डायव्हिंग - अजून एक धाडस!!!!!
जसे मी दुस-यांदा इथे पोचले होते तेव्हापासूनच या वेळी स्काय डायव्हिंग कराययचं....करायचं...असा नुसता जप चालला होता पण खरंच चौकशी करून बुकींग काही होत नव्हतं. पाच वीक एन्ड्स तसेच गेल्यावर शेवटी म्हटलं...बास्स......या वीक एन्डला...."होऊन जाऊ दे!!!!".... जमतील तेवढे गडी जमवायचे...लोक उगाच जास्त हो..नाही करायला लागले तर आपलं आपण जायचं .........पण.....जायचंच!!.....
शेवटी मी, दिपक आणि विशाल...तीनच लोक फ़ायनल येणार असं ठरलं. बुधवारी वेबसाईट नीट बघितली. फोन नंबर घेऊन तिथे बुकिंग साठी मी फोन केला. क्रेडिट कार्ड चे डिटेल्स दिले. सगळी माहिती...सूचना झाल्यावर तिथली ती बया मला म्हटली पेमेंट तुम्ही इथं येऊन करू शकता पण बुकींग कॅन्सल करायचं असेल तर फक्त पुढच्या चोवीस तासात करता येईल. त्या नंतर कॅन्सल केलं किंवा त्या दिवशी आम्ही तिथं तोंडच दाखवलं नाही तर माणशी ५० डॉलर चा चार्ज ती त्या क्रेडिट कार्ड वर लावेल. अन मी बावळट सारखा कंपनी च्या क्रेडीट कार्ड ऎवजी माझ्या पर्सनल क्रेडीट कार्डचा नंबर तिला दिला होता. दिपक अन विशाल ला सांगितलं...बाबांनो....आता प्लॅन चेंज करू नका. न केलेल्या गोष्टीसाठी कंपनी पैसे देणार नाही आणि फुकट ५० डॉलरला फोडणी! दुस-या दिवशी.....२४ तास उलटून गेल्यावर मनात म्हटलं...चला...आता मागं फिरणं अशक्य....५० डॉलर फ़ुकट जाऊ नयेत म्हणून तरी जावंच लागेल...कितीही भिती वाटली तरी :))
बास्स...अन त्या क्षणापासून जेव्हा विचार करायला थोडा वेळ मिळाला...आत्तापर्यंत फोटो आणि व्हिडिओ मध्येच पाहिलेले विमानातून खाली कसं दिसतं ते सीन्स डोळ्यासमोर यायला लागले. मग बरोबरच Universal Studio आणि Disneyland च्या roller coaster राईड्सवर जे climax moment ला जीव घाबरा झाला होता...ते आठवायला लागलं. disneyland च्या milliboomer ride var ती trolly झूम्मदिशी खाली येताना...हवेत अधांतरी असताना कसं विचित्र वाटतं ते आठवून तर..स्वत:ला बळेच घाबरवायची हौस आपल्याला का आलीय असा प्रश्न पडायला लागला.विमानातून उडी मारताना आणि मारल्यावर कसं वाटेल याचा विचार करणं शेवटी प्रयत्नपूर्वक बंद केलं. आयुष्यात पहिल्यांदा...एखाद्या गोष्टीचा intentionally विचार "न करणे" मला चक्क जमलं.
शेवटी तो दिवस...शनिवार उजाडला.बरोबर एक वर्षापुर्वी ११ ऑगस्ट २००६.....मी माझ्या पहिल्या अमेरिका भेटीसाठी सांता बार्बराला पोचले होते. परदेशगमन, घरच्यांपासून दूर एकटी राहणे, विमानप्रवास....ब-याच गोष्टी पहिल्यांदा करत होते...it was like an adventure only!दुसऱ्या अमेरिका भेटीत ११ ऑगस्ट २००७, बरोबर एक वर्षाने अजून एक साहस करायला निघाले होते..sky diving..तसे काही खूप great नाही...पण करताना भिती वाटणार...हे साहजिक होते.
सकाळी सगळं आवरून कॅबने तिथे पोचता पोचता १०:१५ झाले. आमचे बुकिंग ११ चे होते so बराच वेळ होता. मी फोनवरून जिच्याशी बोलले होते त्या मुलीने आम्हाला २-३ फॉर्म्स भरायला दिले आणि एक व्हिडिओ लावून दिला.फॉर्म्समध्ये सगळीकडे आम्हाला सही करून मान्य करायचं होतं की हे सगळे आम्ही पुर्णपणे स्वत:च्या मर्जीने करतो आहोत, आम्हाला यात असलेले सगळे धोके माहीत आहेत. हे करताना अपघात होऊन आम्हाला कायमचे अपंगत्व किंवा मॄत्यू पण होऊ शकतो आणि हे लोक त्यासाठी जबाबदार नाहीत. स्काय डायव्हिंग करताना झालेले अपघात कोणत्याही इन्शुरन्सने कव्हर होत नाहीत....वगैरे वगैरे. हे असले सगळे मुद्दे वाचल्यावर "चला...गुपचुप परत जाऊ या" अशा हास्यास्पद कल्पनेचा दोन मिनिट साठी विचार करून आम्ही त्यावर सह्या केल्या.
आधीच्या एका राऊंडचे लोक खिदळत परत आले, त्यांना हसताना बघून जरा बरं वाटतंय न वाटतंय तोच तिथल्या एका जंपरने स्वत:ची ओळख करून दिली आणि तो सूट घालायला चला असं सांगितलं. अंगावर तो सूट आणि पुढच्या फेरीच्या विमानाचा टेक-ऑफ करतानाचा आवाज....ह्रुदयाचे ठोके परत जलद पडायला लागले.त्यांच्या कॅमेरामनने छोटीशी मुलाखत घेतली अन शेवटी मी आणि दिपक एकाच विमानात आपापल्या जंपर आणि कॅमेरामन बरोबर चढलो. दिपक खूप exite झाला होता किंबहुना माझ्यापेक्षा जास्त! विमान तसे यथातथाच होतं....सीट्स थोडी फाटली होती...मुळात तिथं कोणी आरामात बसावं याचा विचार करून ते बनवलं गेलंच नव्हतं...लोकांना वरती घेऊन जा आणि हवेत त्यांना उडी मारायला लावा...सरळ आणि जलद काम!!विमान सुरू झालं....ठोके आणखी जलद.... जसं विमानने जमीन सोडली...विमानातून उडी मारताना कसं वाटेल...हा विचार थांबवण अशक्य झालं. विमान जमिनीला समांतर होतच नव्हतं...सारखं तिरपं वर वर चढत होतं. बाहेर पाहून अजून टेन्शन येत होतं. सारखं वाटत होतं...आपण मुर्ख आहोत का...भिती वाटत असताना आपण का हे करायला आलो? पण दुसरीकडे हा पण विचार होता..मी भारतात परत गेल्यावर असं काहितरी थ्रिलिंग कधीच करणार नाहीये...आणि वरती हवेत खरंखरं तरंगत असताना खाली बघायला कसं वाटतं हा अनुभव मला निदान एकदा तरी घ्यायचाच होता. मध्ये एकदा त्या जंपर ने माझा सूट त्याच्या सूटशी जोडला...थोडा वेळ गेला आणि मग इतका वेळ माझ्यासमोर बसलेला कॅमेरामन उठला आणि आमच्या जंपर्सने आम्हाला विचारले...पहिले उडी कोण मारणार?...मी क्षणार्धात..मी मारणार असं सांगितलं...कारण एकच...माझ्या आधी दिपकला विमातून अक्षरश: पडताना पाहून मला जास्त टेन्शन आलं असतं. मी तो गॉगल चढवला. कॅमेरामन ने दरवाजा उघडला आणि माझ्या डोक्यात शब्दश: घंटी वाजली...येस्स...शेवटी तो क्षण येऊन ठेपलाय...दरवाजा उघडल्यावर १०५०० फ़ूटावरचं वारं लागलं..खाली छोटी छोटी शेतं आणि रस्ते दिसत होते. मी पुढे आणि तो जंपर मागे..असे आम्ही दारापाशी गेलो.त्याने मला मान वर कर, हात कसे ठेवायचे अशा किरकोळ सूचना आधीच दिल्या होत्या. त्या सगळ्यांची छोटीशी उजळणी करून त्याने मला उजवा गुढगा अगदी दाराशी टेकवायला सांगितला, मान वर..हात खांद्यापाशी...आठवत नाही की माझे डोळे बंद होते का उघडे...आणि....त्याने....say 1......2.....and threeeeeeeeeeeeeeeeeeeeee......असं म्हणून...स्वत:ला आणि मला विमानाबाहेर झोकून दिलं!!!!.......
