Thursday, September 11, 2008

तनिष्का........




१० ऑगस्ट २००८.

४ जून २००८....माझ्या लाडक्या व्यक्तींमध्ये अजून एकाची भर पडली. माझी भाची!!!!!

ख्रिश्चन धर्मात गॉडफादर नावाची संकल्पना असते, आई-वडीलांच्या बरोबरीने जी व्यक्ती त्या बाळाच्या संगोपन आणि भविष्यातील सगळ्या गोष्टीत सहभागी असते (हॅरी पॉटर चा गॉडफादर नाही का..सिरीयस ब्लॅक!!!!). हिंदू धर्मात तशा प्रकारची कुठली संकल्पना माझ्या ऎकिवात नाही पण असती तर मी माझ्या भाचीची "गॉडमदर" नक्कीच झाले असते!

जन्मापासून ते थेट आजपर्यंत तिची दुपटी, लंगोट बदलणे...शी,शू स्वच्छ करणे, आंघोळीच्या आधी तेलमालिश, तिला झोपवणे सगळ्या गोष्टी मी हौसेने केल्या आहेत. आणि एक गोष्ट नक्की माझी "too much protective" आणि "too much caring" बाजू ज्या फार कमी लोकांसाठी आहे त्यात आमची छकुली पहिल्या दिवसापासूनच समाविष्ट झाली.

तिचे नाव काय ठेवायचे याचा विचार सुरू झाला तेव्हा जिजाजींच्या बरोबरीने पुस्तके, इंटरनेट मी पालथे घातले. अगदी काहीच आवडेना तेव्हा कंपनीतली employee direcotry काढून त्यातली मुलींची नावेसुध्दा मी शोधली. शेवटी "तनिष्का" हे नाव ही मीच शोधले, बारशाच्या वेळी तिच्या कानात नाव मीच सांगितले. यमक जुळवणे ब-यापैकी येत असल्यामुळे बारशाच्या आधी दोन तास जशी सुचली तशी बनवलेली ही instant कविता!!!!!


निशा उवाच -

विक्रम आणि शिल्पा च्या
संसारवेलीवरलं पहिलं फूल,
आनंदाचे तरंग उठले सर्वत्र
घरात येता एक मूल....

चाहूल लागता बाळाची पहिल्यांदा
सगळ्यांची झाली होती एकच लगबग,
हे खावे, ते मुळीच करू नये
सूचनांचा पाऊस लगोलग....

आता पाचवा..आता सहावा म्हणत
भर्रकन संपत गेले नऊ मास,
घटका समीप येत चाललीय
आनंददायी विचारांना थोडा काळजीचा स्पर्श.....

चार जूनला शेवटी झाले आगमन
दिला आईला येताना थोडा त्रास
आई आणि बाळ दोघेही सुखरूप
सोडला सर्वांनी सुटकेचा निश्वास......

नव्या बाळाची नवी नवलाई
आई-बाबा पण शिकले नवीन गोष्टी,
घर भरून गेले बाळाच्या वस्तूंनी
कुठे पडलेय झबले अन कुठे दुपटी.....

नाव काय ठेवावे विचार करता
शोध सुरू झाला सर्वांचा जोरात,
हे अवघड आहे ते फारच प्रचलित
एकमागून एक सगळीच नावे बाद.........

असाच मावशी विचार होती करत
कानावर एक नाव पडले आवडले खूप तिला
आई- बाबांनाही ते पसंत पडले अन
लाडक्या भाचीचे नाव ठरले "तनिष्का"!!!...


3 comments:

Vivek said...

मस्तचं ... तनिष्का एकदम गोड आहे....
आणि आता काव्यसंग्रहाचा नविन ब्लोग पण छापून टाका. हातो हात खपेल :-)

Ninad said...

Khupach sunder.

Chala Konitari bidkar halve aahet.

Regards

Ninad Bidkar

9004054422

Unknown said...

Hey name as well as baby both are dam cute..Ur blog is cool!!!

Cheers,
Sonali.Zangruche.